जयस्तंभ अभिवादन २०२६ : मोठ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाची तयारी – २७ नोव्हेंबर रोजी महत्त्वाची बैठक
Maharashtra today news,,
महाराष्ट्र टुडे न्यूज,,
पुणे बातम्या | ब्रेकिंग न्यूज | पोलीस प्रशासन | कायदा व सुव्यवस्था | वाहतूक व सुरक्षा | इव्हेंट पूर्वतयारी | जयस्तंभ अभिवादन २०२६ | मोठा जमाव व्यवस्थापन
#पुणेबातम्या #ब्रेकिंगन्यूज #पोलीसप्रशासन #कायदासुव्यवस्था #जयस्तंभअभिवादन2026 #पोलीसबैठक
#सुरक्षाव्यवस्था #वाहतूकअपडेट #मोठाजमाव #लोणीकंदपोलीस #येरवडापोलीस #PuneNews
#PoliceUpdate #LawAndOrder #SecurityArrangements #TrafficManagement #CrowdManagement
पुणे : जयस्तंभ अभिवादन २०२६ निमित्त १ जानेवारी २०२६ रोजी देशभरातून सुमारे १० ते १५ लाख अनुयायी पेरणे फाटा, ता. हवेली, जि. पुणे येथे येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा, वाहतूक व्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू करण्यात आली आहे.
लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील पुणे–अहिल्यानगर रोडवरील जयस्तंभ परिसरात होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन, पोलीस बंदोबस्त, संघटनांशी समन्वय आणि सूचना जाणून घेण्यासाठी महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे.
ही बैठक मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील,
मा. पोलीस उपआयुक्त (परि-4) श्री. सोमय मुंडे,
मा. पोलीस उपआयुक्त, वाहतूक शाखा श्री. हिंमत जाधव,
आणि मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग श्रीमती प्रांजली सोनवणे
यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहे.
बैठकीचे ठिकाण व वेळ
दिनांक : २७ नोव्हेंबर २०२५ (गुरुवार)
वेळ : सकाळी ११.०० वा.
स्थळ : येरवडा पोलीस स्टेशन, शास्त्रीनगर चौक, येरवडा, पुणे
या बैठकीसाठी सर्व संघटनांचे प्रमुख, कार्यकर्ते तसेच पत्रकार बांधव यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस स्टेशन श्री. सर्जेराव कुंभार यांनी केले आहे.
Maharashtra today news
महाराष्ट्र टुडे न्युज
