Maharashtra today news
पुण्यात बंडगार्डन पोलिसांना मोठ यश! दरोड्याच्या तयारीत असलेले तीन आरोपी अटक”
बंडगार्डन पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईची मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील जुने रेल्वे सिमेंट गोडाऊन, मालधक्का चौक येथे पोलिसांनी अचानक छापा टाकून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले तीन सराईत आरोपी अटक केली आहे
1)जानमोहम्मद नसरुद्दीन शेख,( 2)सतीश ज्ञानेश्वर शिरोळे, आणि( 3)शिव प्रकाश कुमार. असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पकडले असून त्यांना बंड गार्डन पोलीस स्टेशन येथे आणून अंगझडती घेतल्यावर, दरोड्याचे साहित्य आणि सहा चोरीचे मोबाईल फोन जप्त झाले. या कारवाईत एकूण ₹32,160/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
अटक केलेल्या आरोपींवर गु.र.नं. 352/2025 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपासात गु.र.नं. 350/2025 मधील चोरीचा गुन्हाही उघडकीस आला आहे.
ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त राजेंद्र बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त मिलिंद मोहिते, आणि मा. सहा. पोलीस आयुक्त संगिता आल्फान्सो शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या सूचनेनुसार झाली.
या कारवाईत मुख्य सहभाग घेतले पीएसआय धिरज गुप्ता, प्रदीप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, कृष्णकांत श्रीराम, सुर्यकांत राणे, महेश जाधव, ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरे, शिवाजी सरक, ज्ञानेश्वर गायकवाड, आणि राजू धुलगुडे यांनी.
बंडगार्डन पोलिसांच्या या तत्काळ आणि प्रभावी कारवाईमुळे मोठा गुन्हा घडण्याआधीच टळला आहे.
