प्रतिनिधी फिरोज मोगल
सराईत गुन्हेगार ‘टिपू पठाण’वर पुन्हा मोक्का; काळेपडळ पोलिसांची दमदार कारवाई
महाराष्ट्र टुडे न्युज
पुणे — सराईत गुन्हेगार रिजवान उर्फ टिपू सत्तार पठाण आणि त्याच्या साथीदारांवर काळेपडळ पोलिसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे. हडपसरमधील फिर्यादींच्या मालकीच्या स. नं. ७५/७/८, सय्यदनगर येथील १२९० चौ. फुट प्लॉटवर अतिक्रमण, शेड तोडफोड, त्यावर पुन्हा शेड उभारून भाडे वसुली, तसेच २५ लाख रुपयांची खंडणी आणि जीव घेण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
काळेपडळ पोलीस ठाण्यात गु.र.क्र. ४०४/२०२५ अन्वये कलम ३०८(२)(३)(४), १२६(२), १८९(२), १९०, ३५२, ३५१(३), ३२९(३), ६१(२) प्रमाणे गुन्हा दाखल असून तपासात टिपू पठाण हा रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दुखापत, मारामारी असे २५ गुन्हे विविध पोलीस स्टेशनमध्ये नोंद आहेत.
सन २०२० पासून फिर्यादीच्या जागेवर जबरदस्ती ताबा मिळविण्यासाठी व दहशत निर्माण करण्यासाठी टिपू पठाण आणि त्याच्या टोळीने संघटितपणे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्याच्यावर आणि साथीदारांवर मोक्का कलम ३(१)(ii), ३(२), ३(४) अंतर्गत कठोर कारवाई केली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ ५ चे डीसीपी डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस आयुक्त नम्रता देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे यांच्या सूचनेप्रमाणे करण्यात आली.
कारवाईत सहा. पोलीस निरीक्षक अजय हंचाटे, पोउनि विनायक गुरव, पो.हवा. राजेंद्र वाघमारे, बिपीन सुर्यवंशी, हनुमंत कांबळे, प्रतीक लाहिगुडे, प्रविण काळभोर, पो.अं. दादासो नाळे, निलेश परदेशी, शाहीद शेख, अतुल पंधरकर, सद्दाम तांबोळी यांच्या पथकाने ही प्रशंसनीय कामगिरी बजावली.
Maharashtra today news
