महाराष्ट्र टुडे न्यूज
हडपसर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी — १७१ हरविलेले मोबाईल मालकांना परत
Maharashtra today news
हडपसर | २१ नोव्हेंबर २०२५नेताजी मंगल कार्यालय, हडपसर येथे आयोजित कार्यक्रमात हरविलेले व गहाळ मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत देण्याचा उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात एकूण १७१ मोबाईल, त्यापैकी हडपसर पोलिसांकडील ११९ मोबाईल नागरिकांना सुपूर्त करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना श्री संजय मोगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन यांनी केली.यानंतर मा. डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ५) यांनी हरविलेले मोबाईल शोधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सीईआयआर प्रणाली व तांत्रिक शोध पद्धतींबाबत माहिती दिली.
मोबाईल परत मिळाल्याच्या क्षणी अनेक नागरिकांच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसले. मोबाईलमध्ये जपलेल्या आठवणी पुन्हा मिळाल्याचा आनंद व्यक्त करत नागरिकांनी पुणे पोलिसांच्या संवेदनशीलतेचे कौतुक केले.
या उपक्रमासाठी मार्गदर्शन करणारे वरिष्ठ अधिकारी :
मा. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर
मा. रंजन कुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त, पुणे शहर
मा. गनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व विभाग
मा. डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५
उपक्रम यशस्वी करणारे अधिकारी व कर्मचारी :
मा. अनुराधा उदमले, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग
श्रीमती नसरत देसाई, सहायक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग
संजय मोगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन
निलेश जगदाळे, पोनि (गुन्हे)
PSI हसन मुलाणी
PSI सत्यवान गेंड
सायबर PSI अल्ताफ शेख
अंमलदार : संदीप राठोड, बापू लोणकर, माधुरी डोके, सोनाली कुंभार,विक्रम भोर, समीर पांडुळे, प्रकाश सावंत, सुनिल आव्हाड, स्वप्नील भुजबळ, तुकाराम झुंजार, अमोल दणके, महावीर लोणकर
हडपसर पोलिसांनी दाखवलेली तातडी, तांत्रिक कौशल्य आणि नागरिकांप्रती संवेदनशीलता यामुळे हा उपक्रम विशेष ठरला असून, नागरिक–पोलीस विश्वास दृढ करणारा ठरला आहे.
Maharashtra today news
महाराष्ट्र टुडे न्युज

