पोलीस आयुक्त पुणे शहरांच्या आदेशानुसार, घरमालकांनी भाडेकरूंची माहिती वेळेवर पोलीसांना देणे बंधनकारक
पुणे, २२ नोव्हेंबर २०२५:
पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम १६३ (३) अंतर्गत घरमालकांना आदेश दिले आहेत की भाडेकरू ठेवताना तसेच खाजगी मालकांनी नोकर भरती करताना सुरक्षा बाबत दक्षता घेणे आवश्यक आहे आणि भाडेकरूंची माहिती पोलीसांना वेळेवर देणे बंधनकारक आहे. या आदेशाची माहिती पोलीस विभागाकडून वेळोवेळी प्रसार माध्यमांमार्फत दिली जात आहे.
सध्या दिल्ली येथे झालेल्या बॉम्ब स्फोटानंतर सुरक्षा कारणास्तव लोणीकाळभोर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात भाडेकरूंबाबत माहिती घेण्यासाठी तसेच हॉटेल, लॉजेस, मर्मस्थळे व गर्दीच्या ठिकाणी भेटीसाठी विशेष पोलीस पथक तयार करण्यात आले आहे.
दिनांक १९/११/२०२५ रोजी इसम अहेसान अन्सारी यांच्याकडे ब्राउन रंगाची मॅफेड्रॉन (एम.डी.) मिळाल्यानंतर, त्यांच्या काळभोर हाईट्स, पाषाणकर बाग, लोणी काळभोर, हवेली, पुणे येथील राहत्या घरी तपास करण्यात आला. आरोपी भाडेतत्त्वावर राहत असून, त्याचे घरमालक त्यांच्या इमारतीत एकूण १७ भाडेकरू ठेवलेले होते.
भाडेकरूंची माहिती पोलीसांना वेळेवर न दिल्यामुळे, घर मालक व आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम २२३ प्रमाणे लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदर तपास चालू आहे.
मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०५: डॉ. श्री. राजकुमार शिंदे मा. सहा पोलीस आयुक्त, हडपसर विभाग: श्रीमती अनुराधा उदमले श्री. राजेंद्र पन्हाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकाळभोर पोलीस ठाणे, पुणे शहर पोलीस हवा. रवि आहेर, संदीप जोगदंड, बाप्पू वाघमोडे पोलीस पथकाने आरोपीविरुद्ध तपास सुरू ठेवला असून, अधिक तपास लोणी काळभोर पोलीस स्टेशनकडून करण्यात येत आहे.
सर्व घरमालकांनी आणि खाजगी मालकांनी कलम १६३ (३) प्रमाणे भाडेकरूंची माहिती वेळेवर पोलीसांना सादर करावी, तसेच नोकर भरती करताना सुरक्षा दक्षता बाळगावी.

