Maharashtra today news
धाराशिव जिल्हास्तर युवा महोत्सवात विद्यार्थ्यांना भारतीय संविधान उद्देशिका वाटप
धाराशिव, पुणे – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हास्तर युवा महोत्सव 2025-26 धाराशिव येथे संपन्न झाला. यामध्ये जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी चित्रकला, काव्य लेखन आणि कहानी लेखन स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या प्रसंगी न्यू कनिष्ठ स्वतंत्र कला महाविद्यालय, करजखेडा येथील आठ विद्यार्थिनींनी महाविद्यालयाचे प्रभावी प्रतिनिधित्व केले. विद्यार्थ्यांनी नशामुक्त आणि समृद्ध राष्ट्र निर्माण करण्याचे संदेश त्यांच्या चित्रांद्वारे दिले, याबद्दल जिल्हाधिकारी यांनी वैयक्तिकरित्या कौतुक केले.
मतदार जनजागरण समितीच्या संविधान जनजागृती उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना भारतीय संविधान उद्देशिका विश्लेषण प्रती वाटप करण्यात आल्या. तसेच प्रा. बाळासाहेब अणदुरकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेतील भाषण असलेले पुस्तक देण्यात आले.
यावेळी मतदार जनजागरण समितीचे कार्याध्यक्ष गणेश रानबा वाघमारे, प्रा. परमेश्वर ढमाले, प्रा. बी. ई. ओव्हाळ उपस्थित होते.
