घरफोडी टोळीचा पर्दाफाश; १४ लाखांचा मुद्देमाल जप्त — विमानतळ पोलिसांची मोठी कामगिरी
पुणे (दि. 13 नोव्हेंबर) प्रतिनिधी अमोल धेंडे ,
Maharashtra today news
विमानतळ पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी घरफोडी आणि चोरी करणाऱ्या सराईत टोळीला गजाआड करत तब्बल ₹१४ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईत ०८ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून, दोन सराईत आरोपी आणि एका विधीसंघर्षित बालकाला अटक करण्यात आली आहे.
विमानतळ पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५४४/२०२५ भा.दं.वि. कलम ३०५ (अ), ३३१ (४), ३३१ (३), ३१७(२), ३ (५) अंतर्गत फिर्याद दाखल झाली होती. अज्ञात चोरट्याने दि. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी फिर्यादीच्या घराचे दरवाज्याचे कडी-कोयंडे तोडून ₹१०,५१,०९३ किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरी केली होती.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार योगेश थोपटे, ज्ञानदेव आवारी, लालु कन्हे आणि हरीप्रसाद पुंडे यांनी केला असता, तपासात आरोपींचा शोध लागला. पोलिसांनी तत्काळ शिवम दत्ता अवचर (१९, रा. कामटे कॉलनी, न-हे) आणि नवनाथ उर्फ लखन बाळू मोहिते (२२, रा. वैदुवाडी, हडपसर) यांना अटक केली, तर एक विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून चोरीतील ₹१० लाख किमतीचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली. पुढील तपासात आरोपींनी दिवाळीच्या काळात विविध ठिकाणी दुकानांचे शटर उचकटून व घरे फोडून केलेले ७ गुन्हे कबूल केले. त्यांच्याकडून आणखी ₹२,०६,००० किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (पूर्व विभाग) श्री. मनोज पाटील, उप-आयुक्त परि ०४ श्री. सोमय मुंडे आणि सहा. पोलीस आयुक्त श्रीमती प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. मनोज बरुरे, नितीन राठोड आणि अंमलदार थोपटे, आवारी, कन्हे, पुंडे, पिसाळ, इथापे, बर्डे, नाईक, जोगदंडे, कासार, म्हस्के, चव्हाण आणि जोशी यांच्या पथकाने ही उत्कृष्ट कामगिरी केली.
या यशस्वी कारवाईबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपूर्ण पथकाचे कौतुक केले आहे.
Maharashtra today news
महाराष्ट्र टुडे न्यूज,,,,
