देवणी पोलिसांची गुटखा माफियांवर धडक कारवाई; ₹6.57 लाखांचा मुद्देमाल जप्त
देवणी, ता. 13 नोव्हेंबर (प्रतिनिधी) फिरोज मोगल
Maharashtra today news
लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे तसेच अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या सूचनेनुसार जिल्हाभरात गुटखा, तंबाखू आणि इतर प्रतिबंधित वस्तूंवर मोठ्या प्रमाणात कारवाया सुरू आहेत. त्या मोहिमेअंतर्गत देवणी पोलिसांनी गुरुवारी रात्री मोठी कारवाई करत तब्बल ₹6,57,920/- किमतीचा गुटखा आणि वाहन जप्त केले आहे.निलंगा उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल धुमे यांच्या मार्गदर्शनाखाली व देवणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भिमराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.दि. 12 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 8.40 वाजता देवणी तालुक्यातील लासोना ते देवणी रस्त्यावरील पुलाजवळ गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. त्यावेळी MH-01AR-4817 क्रमांकाची टाटा इंडीगो कार संशयितरित्या फिरताना आढळली. वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेला गुटखा व सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला.
पोलीसांनी आरोपी रिजवान मन्नान मोमीन (वय 36, रा. शिवडी बाजीराव, ता. लोहा, जि. नांदेड) याला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे —विमल पान मसाला” गुटखा – 32 पोती (किंमत ₹2,08,000/-)V1” तंबाखू – 32 पोती (किंमत ₹49,920/-)टाटा इंडीगो कार (MH-01AR-4817) – किंमत ₹4,00,000/-
एकूण मुद्देमाल किंमत : ₹6,57,920/-
या प्रकरणी देवणी पोलिसांनी गु.र.नं. 328/2025 अंतर्गत कलम 123, 223, 274, 275 भा.दं.वि. तसेच कलम 59 अन्न सुरक्षा व मानके अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पो.उपनिरीक्षक वऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, ही कारवाई सपोनि. भिमराव गायकवाड, पो.उपनि. वऱ्हाडे, पो.उपनि. कोंडामंगले आणि पो.अंमलदार योगेश गिरी यांनी एकत्रितपणे केली आहे.
महाराष्ट्र टुडे न्यूज,,,,,
