ADVERTISEMENT
Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

Live TV

सांगली हादरलं! गारपीर परिसरात दुहेरी हत्याकांड — दलित नेते उत्तम मोहिते आणि शाहरुख शेख दोघांचा जागीच मृत्यू!


प्रतिनिधी अमोल धेंडे

 सांगली शहरातील गारपीर परिसरात मंगळवारी मध्यरात्री नंतर रक्तरंजित घटना घडली असून, संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.

दलित महासंघाचे कार्यकर्ते उत्तम मोहिते यांच्यावर शा-या उर्फ शाब्या शाहरुख शेख या इसमाने तलवारीसारख्या धारदार हत्याराने जीवघेणा हल्ला केला.हल्ला इतका भीषण होता की उत्तम मोहिते यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर संतापलेल्या उत्तम मोहिते यांच्या पुतण्याने आरोपी शेखवर प्रत्युत्तरात हल्ला चढवला.या हल्ल्यात शेखचाही जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.क्षणातच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.

उत्तम मोहिते आणि शाहरुख शेख यांच्यातील जुन्या वैमनस्यातून ही दुहेरी हत्या घडल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

मात्र, ही सुपारी किलिंग होती का, की इतर कोणते कारण यामागे दडले आहे, याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे.

या प्रकरणात किमान चार जणांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

घटनेनंतर सांगली शहर पोलिस दलाची संपूर्ण यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली.

फॉरेन्सिक पथक, श्वानपथक आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन पुरावे गोळा करण्यात व्यस्त आहेत.

गारपीर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

या दुहेरी हत्याकांडानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नागरिकांमध्ये एकच चर्चा सुरू आहे —

“नेमकं कारण काय? एवढं रक्तरंजित प्रकरण घडलं कसं?”

सांगलीतील गारपीर परिसरात घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाने पुन्हा एकदा शहर हादरलं आहे.

एकीकडे दलित नेत्याचा वाढदिवस आणि दुसरीकडे रक्तरंजित रात्र —सांगलीची शांतता या हत्याकांडाने पूर्णतः तुटली आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Author

मुख्य संपादक - गोरख सोनवणे

9503585893

gorakhsonwane234@gmail.com

Sadesatranadi Road, Malwadi, Hadapsar, Pune 28

Google AdSense Icon Advertisement
Design by - Blogger Templates |