ADVERTISEMENT
Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

Live TV

काळेपडळ पोलीस स्टेशनची सामाजिक पुढाकार — विधी संघर्षित बालकांचे समुपदेशन करून घडवला सकारात्मक बदल!

 


काळेपडळ पोलीस स्टेशनची सामाजिक पुढाकार — विधी संघर्षित बालकांचे समुपदेशन करून घडवला सकारात्मक बदल!

आज दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी, काळेपडळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीसांनी एक सामाजिक उपक्रम राबवला.

माननीय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, सायंकाळी ८ ते ८:४५ या वेळेत, काही विधी संघर्षित बालकांना पोलीस स्टेशन येथे समक्ष बोलवण्यात आले.या वेळी त्यांना योग्य सूचना आणि मार्गदर्शन देण्यात आले.पोलिसांनी त्यांच्या डोझियरची नोंद केली, तसेच त्यांच्या नातेवाईक आणि पालकांशी संवाद साधून योग्य ते समुपदेशन केले.



या विधी संघर्षित बालकांनी भविष्यात अशा प्रकारचे गुन्हे पुन्हा न घडतील, अशी ग्वाही दिली आहे.यासोबतच पोलिसांकडून योग्य प्रतिबंधक कार्यवाहीची तयारी सुरू करण्यात आली असून, बालकांचे मन परिवर्तन समुपदेशनाद्वारे करण्याचा प्रयत्न केला जात आहे.या उपक्रमातून पोलिसांनी केवळ गुन्हेगारीवर आळा घालण्याचाच नाही, तर समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला आहे.

पालक आणि स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक व्यक्त केले आहे.

“कायद्याच्या मार्गाने समाज परिवर्तन” — या संकल्पनेला काळेपडळ पोलीस स्टेशनने आज प्रत्यक्ष रूप दिले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Author

मुख्य संपादक - गोरख सोनवणे

9503585893

gorakhsonwane234@gmail.com

Sadesatranadi Road, Malwadi, Hadapsar, Pune 28

Google AdSense Icon Advertisement
Design by - Blogger Templates |