मिरजेत खून प्रकरणातील आरोपींवर खुनी हल्ल्याचा प्रयत्न – संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद
Maharashtra today news,,
मिरजेत खळबळजनक घटना!खून प्रकरणातील आरोपींवरच आज भल्या पहाटे खुनी हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला असून, आता त्या फुटेजमुळे तपास वेगाने पुढे जाण्याची शक्यता आहे.
ही आहेत मिरजेतील आज सकाळची धक्कादायक दृश्ये.
समोर दिसत आहेत खून प्रकरणातील आरोपी… आणि अचानक मागून येतो एक हल्लेखोर!हातात धारदार शस्त्र… थेट आरोपींवर हल्ल्याचा प्रयत्न! पण सतर्कतेमुळे गंभीर अनर्थ टळला.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते की हल्लेखोर काही क्षण परिसरात थांबतो, परिस्थिती पाहतो आणि अचानक आरोपींवर तुटून पडतो.
या सगळ्या प्रकारानंतर आरोपी पळत सुटतात… आणि हल्लेखोरही काही क्षणात फरार होतो.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
फुटेजच्या आधारे हल्लेखोराची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पहिल्याच खून प्रकरणामुळे तणावग्रस्त वातावरण… आणि त्यात हा नवीन हल्ला, त्यामुळे मिरजेत पुन्हा भीतीचे सावट निर्माण झाले आहे.
या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जातो, हल्ला का करण्यात आला, यामागचे सूत्रधार कोण—हे सर्व प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेपोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. आम्हीही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत.
महाराष्ट्र टुडे न्यूज