गुन्हे शाखा युनिट-२ ची मोठी कारवाई : ०४ पिस्टल व ०५ काडतुसे जप्त
Maharashtra today news
पिंपरी चिंचवड | दि. 12 नोव्हेंबर 2025 पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त मा. श्री. विनय कुमार चौबे यांनी अवैध अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्या इसमांवर कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर गुन्हे शाखा युनिट-२ ने एक मोठी धडक कारवाई करून तीन सराईत आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत ०४ देशी बनावटीच्या पिस्टल व ०५ जिवंत काडतुशांचे जप्तीकरण करण्यात आले.
गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई अमर राणे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, रेकॉर्डवरील काही सराईत गुन्हेगार हिंजवडी-माण रोडवरील बोडकेवाडी फाटा परिसरात अवैध शस्त्रांसह येणार आहेत. त्यानुसार, वपोनि अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले.
अटक आरोपींची नावे पुढीलप्रमाणे :
1. प्रविण गुंडेश्वर अंकुश (वय 21), रा. कात्रज, पुणे
गुन्हे: घाटकोपर पो.ठाणे – गु.र. 24/2023, भादंवि 363, 354 सह कलम 8,12 POSCO
2. विकी दिपक चव्हाण (वय 20), रा. हिंजवडी
गुन्हे: हिंजवडी पो.ठाणे – गु.र. 1022/2025, आर्म्स अॅक्ट 3(25)
3. रोहित फुलचंद भालशंकर (वय 22), रा. वडगाव बु., सिंहगड रोड
गुन्हे: हिंजवडी – गु.र. 90/2024, आर्म्स अॅक्ट 3(25)
खडक – गु.र. 110/2025, BNS 137(2), POSCO 4, 8, 12
शिरूर – गु.र. 242/2023, भादंवि 379
पथकाने तिघांकडून चार पिस्टल व पाच जिवंत काडतुसे असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ही कारवाई सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त श्री. सारंग आवाड, पोलीस उपायुक्त गुन्हे डॉ. शिवाजी पवार, तसेच सपोआ गुन्हे-1 विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पोउपनि मयुरेश साळुंखे, पोउपनि दीपक खरात, सपोउपनि संजय गवारे, प्रविण दळे, नितीन ढोरजे, तसेच पोहवा शिंदे, पोहवा तुषार शेटे, पोहवा मोहम्मद गौस नदाफ, पोहवा भाऊसाहेब राठोड, पोहवा विक्रम कुदळ, पोहवा अली शेख, पोहवा कृष्णा शितोळे, आणि पोशि प्रशांत सैद, पोशि सुखदेव गावंडे, पोशि अमर राणे, पोशि रवि पवार, पोशि धनंजय जाधव यांचा सहभाग होता
महाराष्ट्र टुडे न्यूज
