Maharashtra today news
प्रभाग 17 मधून धनराज दिगंबर गवळींची इच्छुकता; सामाजिक कार्याचा भक्कम वारसा
पुणे | प्रभाग क्रमांक 17 – माळवाडी, रामटेकडी
प्रभाग क्रमांक 17 मधून आपली इच्छुकता जाहीर करताना समाजकारणात उल्लेखनीय योगदान देणारे धनराज दिगंबर गवळी या नावाकडे पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले आहे. दीर्घकाळापासून गोरगरिबांसाठी अथक परिश्रम घेणाऱ्या गवळी यांच्या कार्याचा ठसा सर्वत्र उमटलेला दिसतो.
गवळी यांनी गेल्या अनेक वर्षांत आरोग्य, शिक्षण, रोजगार व सामाजिक न्याय या क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. परिसरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके व गणवेश वाटप, महिलांसाठी रोजगाराच्या संधी, तरुणांसाठी उद्योग मार्गदर्शन, तसेच मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करणे हे त्यांचे प्रमुख उपक्रम आहेत.
करोना काळात गवळी यांनी केलेले कार्य अत्यंत धाडसी व मानवी मूल्यांचे प्रतीक ठरले. शेकडो गरीब नागरिकांची हॉस्पिटल बिले माफ करणे, रुग्णांना प्रत्यक्ष मदत करून हाताला धरून बाहेर काढणे, तसेच हजारो गरजूंना रेशन किट वाटप करून त्यांनी समाजाचा खरा आधार बनण्याची भूमिका पार पाडली.
विधवा व ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन योजना लागू करून देणे, विविध समस्यांमध्ये न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने लढणे, पाणीपुरवठा व इंटरनेट यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर जनतेसाठी उपलब्ध राहणे, अशी त्यांची सेवाप्रवृत्ती अनेकांच्या मनात कायमची घर करून आहे.
गवळी यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल विविध स्तरावर घेण्यात आली असून त्यांना
राज्यपाल पुरस्कार – योद्धा महाराष्ट्र,
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स सन्मान,
महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड,
पोलीस रत्न पुरस्कार,
तसेच लोकमत बिझनेस आयकॉन अवॉर्ड
यांसारखे बहुमान मिळाले आहेत.
प्रभाग 17 माळवाडी–रामटेकडी परिसरात त्यांच्या इच्छुकतेला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, अनेकांना त्यांच्या नेतृत्वाकडून विकास, सेवा आणि सुरक्षिततेची सकारात्मक अपेक्षा
महाराष्ट्र टुडे न्यूज
