प्रतिनिधी अमोल धेंडे,,,
सात वर्षीय चिमुकलीवर अमानुष अत्याचार; आरोपी देवीदास गर्जे काही तासांत अटकेत
महाराष्ट्र टुडे न्यूज
Maharashtra today news
ओतूर (जुन्नर) : मालेगाव प्रकरणाचे पडसाद अजूनही सुरू असताना पुणे जिल्ह्यातील ओतूर गावात सात वर्षीय चिमुकलीवर अमानुष अत्याचाराची हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. ऊसतोड मजूर कुटुंबातील ही मुलगी घराजवळ खेळत असताना देवीदास रोहीदास गर्जे (वय अंदाजे ३५) या आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती उघड झाली.
घटनेनंतर चिमुकली घाबरलेल्या अवस्थेत घरी धावत आली आणि आईला प्रकाराची माहिती दिली. पालकांनी तातडीने ओतूर पोलिसांत तक्रार दाखल केली.
ओतूर पोलिसांची तातडीची धडाकेबाज कारवाई
तक्रार मिळताच पोलिसांनी त्वरित हालचाल करत फक्त काही तासांच्या आत आरोपी देवीदास गर्जेला अटक केली. या कारवाईचे मार्गदर्शन पोलीस निरीक्षक संजय साळुंके यांनी केले असून पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे पुढील तपास करीत आहेत.
पीडित बालिकेवर तात्काळ उपचार
अत्याचारानंतर पीडित बालिकेवर पुण्यातील शासकीय रुग्णालयात तात्काळ उपचार सुरू करण्यात आले आहेत. वैद्यकीय तपासणीचा अहवाल प्रतीक्षेत असून तो तपासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
घटनेमुळे उसतोड वस्त्यांमध्ये भीतीचे वातावरण असून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सामाजिक संघटनांनी या प्रकरणाचा तीव्र निषेध व्यक्त करत प्रशासनाने वस्त्यांमध्ये सुरक्षा उपाय वाढवावेत, अशी माgणी केली आहे.
महाराष्ट्र टुडे न्यूज
