Maharashtra today news
फुरसुंगी–उरुळी देवाची नगरपरिषद: आम आदमी पार्टीकडून लोकनायक पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष व ‘पुण्य प्रहार’ वृत्तपत्राचे मुख्य संपादक यशवंत अरुण बनसोडे यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल
फुरसुंगी/उरुळी देवाची – आगामी नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज लोकनायक पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष, ‘पुण्य प्रहार’ वृत्तपत्राचे मुख्य संपादक व संचालक आणि प्रख्यात पत्रकार यशवंत अरुण बनसोडे यांनी आम आदमी पार्टीतर्फे नगराध्यक्ष पदासाठी अधिकृतपणे अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकारितेत दीर्घकाळ काम करताना बनसोडे यांनी जनतेच्या समस्या, सामाजिक प्रश्न आणि लोकहिताशी निगडित मुद्द्यांवर निर्भीडपणे आवाज उठवला आहे. ‘‘पुण्य प्रहार’’ या वृत्तपत्राचे मुख्य संपादक व संचालक म्हणून त्यांनी अनेक प्रामाणिक आणि भेदक बातम्यांद्वारे लोकांचे प्रश्न प्रकाशात आणले आहेत. लोकनायक पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी पत्रकारांच्या सामाजिक आणि व्यावसायिक हक्कांसाठी उल्लेखनीय कार्य केले आहे.
अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना यशवंत बनसोडे म्हणाले,
“पत्रकार म्हणून मी अनेक वर्षे नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष अनुभवल्या आहेत. आता त्या समस्यांच्या निराकरणासाठी लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याचा संकल्प केला आहे. पुढे बोलताना ते असेही म्हणाले की राजकारणासाठी नव्हे तर समाजकारणासाठी मी या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. स्वच्छ, पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासन देणे हेच माझे ध्येय आहे.”
यशवंत बनसोडेंच्या उमेदवारीनंतर आम आदमी पार्टीत उत्साहाचे वातावरण असून, त्यांच्या अनुभव, सामाजिक बांधिलकी आणि लोकाभिमुख कामामुळे निवडणुकीत पक्षाला मोठे बळ मिळेल,आम आदमी पार्टीने यापूर्वीच नगरपरिषद निवडणुकांमध्ये पारदर्शक आणि प्रामाणिक नेतृत्व पुढे आणण्याचा संकल्प केला असून, बनसोडे यांच्या उमेदवारीमुळे पक्षाला स्थानिक स्तरावर नवी उर्जा मिळाल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे
महाराष्ट्र टुडे न्यूज
