Maharashtra today news
महाराष्ट् टुडे न्यूज
डेमूची धडक आणि तीन जीव संपले; हडपसर पोलिस कसून तपासात,,
पुणे | प्रतिनिधी,,,
पुणे-दौंड डेमू ट्रेनच्या जोरदार धडकेत तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, हे तिन्ही तरुण रेल्वे रुळ ओलांडत असताना ही दुर्घटना झाली. धडक एवढी भीषण होती की तिघांचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळी रेल्वे पोलिसांसह हडपसर पोलिस ठाण्याचे पथक पोहोचले असून तपासाची सुरुवात करण्यात आली आहे. मृत तरुणांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असून आसपासच्या सिसिटीव्ही फुटेजचाही तपास करण्यात येत आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,घटनेच्या वेळी डेमू ट्रेन पुण्याहून दौंडकडे वेगाने जात होती. रूळ ओलांडताना तरुणांनी ट्रेनचा येणारा वेग दुर्लक्षित केला असावा, अशी प्राथमिक माहिती आहे. मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
हडपसर पोलिसांनी सांगितले की, “ही घटना अत्यंत गंभीर आहे. नेमकी परिस्थिती काय होती, याचा सर्व angle ने तपास सुरू आहे.”
या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून स्थानिक नागरिकांनी रेल्वे क्रॉसिंगवर सुरक्षा उपाययोजनांची मागणी केली आहे.
Maharashtra today news,,
