प्रतिनिधी फिरोज मोगल
महाराष्ट्र टुडे न्यूज
दिघी पोलीसांची धडाकेबाज कामगिरी : खूनप्रकरणातील सर्व आरोपी जेरबंद
Maharashtra today news
पुणे | दिघी पोलीस ठाणे हद्दीतील अलंकापुरम रोड, वडमुखवाडी येथे झालेल्या खूनप्रकरणातील सर्व आरोपींना दिघी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने, गुन्हे शाखा युनिट–३ आणि खंडणी विरोधी पथकाच्या मदतीने अल्पावधीतच जेरबंद केले आहे. अत्यंत शिताफीने आखलेल्या सापळ्यातून आरोपी ताब्यात घेतल्याने गुन्हा पूर्णपणे उघड झाला आहे.
दिनांक १२ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता नितीन गिलबिले या इसमाचा खडी मशीन रोड, वडमुखवाडी येथे पिस्तुलातून गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. गुन्हा करून सर्व आरोपी पसार झाले होते.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक तपास, गुप्त माहितीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रमुख आरोपी विक्रांत ठाकुर व सुमित पटेल यांना गुन्हे शाखेच्या पथकाने ताम्हीनी घाट परिसरातून ताब्यात घेतले.
त्यानंतर पाहिजे आरोपी अमित जीवन पठारे याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली. गुप्त माहिती मिळाल्यानंतर वाघोली येथील कावेरी हॉटेलजवळ सापळा रचून पथकाने त्याला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना अटक केली. दरम्यान, आरोपी आकाश सोमनाथ पठारे यालाही गुन्हे शाखा युनिट–३ च्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
अटक आरोपींपैकी अमित पठारे आणि विक्रांत ठाकुर हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून सर्व आरोपींना सलग कारवाईत पकडण्यात पोलीसांना यश आले आहे.
या संपूर्ण कारवाईत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अतिरिक्त कार्यभार अपर पोलीस आयुक्त श्रीमती श्वेता खेडकर, उप आयुक्त मारुती जगताप, डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरेश्री प्रविण मोरे, सहा पोलीस आयुक्त भोसरी एमआयडीसी विभाग, श्री सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनाखाली दिघी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, प्रमोद वाघ, गुन्हे शाखा युनिट ३ चे श्री संतोष कसचे व त्यांचे पथक, खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखेकडील श्री राजेंद्र पाटील व त्यांचे पथक, दिघी पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक, गुन्हे, विनायक पाटील, सहा. पोलीस निरीक्षक, श्रीनिवास कामुनी, पोलीस उप निरीक्षक, आबा करपाळे, दिपक राहणे, सिध्दार्थ शिंदे, तसेच पोलीस अंमलदार राजु जाधव / स्वप्नील लांडगे / योगेश नागरगोजे, नितीन तारडे, रामदास बहिरट, चंद्रकांत पारधी / सुधिर डोळस, / चंद्रकांत गाडे/ नितीन लवटे / उमेश कसबे, योगेश शेळके बाबाजी जाधव, चेतन साळवे, दत्ता मुंडे यांचे पथकाने केली आहे
महाराष्ट्र टुडे न्यूज
Maharashtra today news.
