Maharashtra today news
सुपे ग्रामपंचायतीला भारत नेट स्मार्ट व्हिलेज योजनेची मोठी गती
दिनांक : १८ नोव्हेंबर २०२५ भारत नेट स्मार्ट व्हिलेज योजना अंतर्गत बारामती तालुक्यातील सुपे गावाचा समावेश असलेल्या दहा गावांच्या प्रगत विकास उपक्रमांना आज गती मिळाली. पंचायत समिती बारामतीचे गटविकास अधिकारी किशोरजी माने यांच्या उपस्थितीत भारत नेट टीमने सुपे ग्रामपंचायतीला भेट देत विविध शासकीय ठिकाणांचा आढावा घेतला.
या भेटीदरम्यान ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडी, ग्रामीण रुग्णालय तसेच पशुवैद्यकीय दवाखाना येथे इंटरनेट सुविधा, डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि आवश्यक तांत्रिक उभारणीची पाहणी करण्यात आली.
स्मार्ट व्हिलेज योजने अंतर्गत गावांमध्ये खालील महत्त्वाचे उपक्रम राबविण्याचा विचार आहे—
ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय यांना हाय-स्पीड इंटरनेटद्वारे एकमेकांशी जोडणे
शेती क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा वापर
ठिबक व तुषार सिंचन, ग्रीन हाऊस सारख्या आधुनिक शेती पद्धतींचा प्रसार
महिलांसाठी रोजगार निर्मिती व प्रशिक्षण उपक्रम
डिजिटल सेवा गावपातळीवर उपलब्ध करून देणे
या भेटीमुळे सुपे गावात स्मार्ट व्हिलेज संकल्पना प्रत्यक्षात उतरण्याचा मार्ग मोकळा झाला असून ग्रामविकासाच्या नव्या शक्यता खुल्या झाल्या आहेत.
महाराष्ट्र टुडे न्यूज,,,
