ADVERTISEMENT
Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

Live TV

Pune Kidnappingap:पुणे जिल्हा बँक निवडणुकीच्या नावाखाली महिलेचे अपहरण; माजी पंचायत समिती सभापतीसह तिघांवर गुन्हा

 


Maharasstra today news 

Pune Kidnappingap:पुणे जिल्हा बँक निवडणुकीच्या नावाखाली महिलेचे अपहरण; माजी पंचायत समिती सभापतीसह तिघांवर गुन्हा

राजगुरुनगर : पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील आंबोली येथे ४७ वर्षीय महिलेचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मतदार प्रतिनिधी निवडीमध्ये बहुमत सिद्ध करण्याच्या कारणावरून हे अपहरण करण्यात आल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात माजी पंचायत समिती सभापतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खेड तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी मतदार प्रतिनिधी निवडीमध्ये बहुमत सिद्ध करण्यासाठी संबंधित महिलेला आपल्या बाजूने ठेवण्याच्या उद्देशाने तिचे अपहरण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर खेड पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अपहरणामागील नेमके कारण, महिलेची भूमिका आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून, पोलिस तपासात या प्रकरणातील आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Author

मुख्य संपादक - गोरख सोनवणे

9503585893

gorakhsonwane234@gmail.com

Sadesatranadi Road, Malwadi, Hadapsar, Pune 28

Google AdSense Icon Advertisement
Design by - Blogger Templates |