ADVERTISEMENT
Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

Live TV

Swami prakat dinहडपसरमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा”

 “





Swami prakat dinहडपसरमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा”

हडपसर (प्रतिनिधी): श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त साने गुरुजी हॉस्पिटल, हडपसर येथे आयोजित सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात व उत्साहात पार पडला. शुक्रवार दिनांक २० मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता झालेल्या या कार्यक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा अनेक भक्तांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. संपूर्ण परिसर “स्वामी समर्थ”च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता, ज्यामुळे वातावरण अधिकच भक्तिमय झाले.

या कार्यक्रमाचे आयोजन मा. श्री. बाळासाहेब किसन तुपे पाटील व मा. श्री. रोहित बाळासाहेब तुपे पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

या प्रसंगी खालील मान्यवर उपस्थित होते:

बाळासाहेब किसन तुपे पाटील,

रोहित बाळासाहेब तुपे पाटील,

शिवाजी सोनटले,

संजय तुपे पाटील,

गुलाब जाधव (सर),

विनोद दिघे,

राकेश गोधडे

शामराव दिघे, पाटील,

आणि कार्तिक पिंजण आदी मान्यवर उपस्थित होते.




या निमित्ताने बाळासाहेब किसन तुपे पाटील यांच्या सामाजिक कार्याचा विशेष उल्लेख करण्यात आला. ते नेहमीच सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी धावून जातात. गरजू  लोकांना आर्थिक मदत करून त्यांना आधार देण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे.

या सोहळ्याच्या माध्यमातून धार्मिकतेसोबतच समाजातील एकोपा, सेवा व सहकार्याचा संदेश देण्यात आला. उपस्थित भाविकांनी कार्यक्रमाचे कौतुक करत आयोजकांचे अभिनंदन केले.कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Author

मुख्य संपादक - गोरख सोनवणे

9503585893

gorakhsonwane234@gmail.com

Sadesatranadi Road, Malwadi, Hadapsar, Pune 28

Google AdSense Icon Advertisement
Design by - Blogger Templates |