Maharashtra today news
Crime news ठाणे पोलिसांची मोठी कारवाई: खुनाच्या प्रयत्नातील दोन सराईत आरोपी जेरबंद
ठाणे (प्रतिनिधी): ठाणे शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने मोठी कारवाई करत खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील दोन सराईत आरोपींना अटक केली आहे.
दिनांक १८ मार्च २०२६ रोजी कापुरबावडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ११७/२०२६ अन्वये विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक गस्त घालत असताना गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली.
खंडणी विरोधी पथकातील अधिकारी सपोनि भूषण कापडणीस, पोहवा शैलेश शिंदे, तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने सापळा रचून दोन्ही आरोपींना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे:
निलेश लालचंद यादव (वय ३१), रा. कळवा, ठाणे
ओमकार सतिश भोसले (वय २८), रा. वर्तकनगर, ठाणे
दोन्ही आरोपींना १९ मार्च २०२६ रोजी सुमारे दुपारी ३.३० वाजता अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी कापुरबावडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या कारवाईमुळे ठाणे शहरात दहशत माजवण्याचा प्रयत्न उधळून लावण्यात पोलिसांना यश आले आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
