ADVERTISEMENT
Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

Live TV

Crime newsनारपोली पोलीस स्टेशनचे“वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली फरार गुन्हेगार कोल्हापूरमधून जेरबंद

 


Maharashtra today news,,,

Crime newsनारपोली पोलीस स्टेशनचे“वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली फरार गुन्हेगार कोल्हापूरमधून जेरबंद”

भिवंडी : भिवंडी सब जेलमधून फरार झालेल्या सराईत गुन्हेगाराला अखेर पोलिसांनी कोल्हापूरमधून ताब्यात घेत मोठी कामगिरी बजावली आहे.

नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील व पोलीस हवालदार सस्कर (बकल नं. 3473) यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शांतीनगर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 124/2026, भारतीय न्याय संहिता कलम 262 अंतर्गत दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी रवींद्र धनाजी भोसले (वय 24, रा. साठे नगर, भिवंडी) हा कोल्हापूर येथील रंकाळा परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

सदर माहितीच्या आधारे नारपोली पोलिसांनी कोल्हापूर एलसीबी (स्थानिक गुन्हे शाखा) यांच्याशी समन्वय साधत तात्काळ सापळा रचला. त्यानुसार दिनांक 18 मार्च 2026 रोजी सायं. 4 वाजता आरोपी रवींद्र भोसले याला रंकाळा परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

दरम्यान, सदर आरोपीला पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यासाठी शांतीनगर पोलीस ठाण्याचे पथक कोल्हापूरकडे रवाना करण्यात आले आहे.

या कारवाईमुळे फरार गुन्हेगाराला पकडण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले असून परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Author

मुख्य संपादक - गोरख सोनवणे

9503585893

gorakhsonwane234@gmail.com

Sadesatranadi Road, Malwadi, Hadapsar, Pune 28

Google AdSense Icon Advertisement
Design by - Blogger Templates |