ADVERTISEMENT
Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

Live TV

Kalyan crime news,बाप रे!“रेल्वे बोर्डाचा अधिकारी असल्याची बतावणी; लाच घेताना तोतया इन्स्पेक्टर अटकेत

 




Maharashtra today news,,,

Kalyan crime news,बाप रे!“रेल्वे बोर्डाचा अधिकारी असल्याची बतावणी; लाच घेताना तोतया इन्स्पेक्टर अटकेत”

कल्याण रेल्वे स्थानकात भरदुपारी मोठा थरार

रेल्वेच्या दक्षता पथकाने तोतया व्हिजिलन्स इन्स्पेक्टरला रंगेहाथ पकडले

कल्याण | प्रतिनिधी,,,,,

कल्याण रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे कर्मचाऱ्यालाच गंडा घालण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्वतःला रेल्वे बोर्डाचा दक्षता निरीक्षक (व्हिजिलन्स इन्स्पेक्टर) असल्याचे भासवून एका रेल्वे कर्मचाऱ्याकडून लाच उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या तोतया अधिकाऱ्याला रेल्वेच्या सतर्क दक्षता पथकाने रंगेहाथ पकडल्याने रेल्वे वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

हर्षिश कांबळे असे या तोतया अधिकाऱ्याचे नाव असून, तो आपण मुंबई डीआरएम कार्यालयातील रेल्वे बोर्डाचा व्हिजिलन्स इन्स्पेक्टर असल्याची बतावणी करत होता. कल्याण स्थानकात कार्यरत असलेल्या एका बुकिंग क्लार्कचे काही देयक (थकीत पैसे) डीआरएम कार्यालयात अडकले असल्याची माहिती त्याला मिळाली होती. हे पैसे लवकर मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत त्याने संबंधित कर्मचाऱ्याकडे लाचेची मागणी केल्याचे समोर आले आहे.

लाचेच्या जाळ्यात अडकला तोतयाx

रेल्वे कर्मचाऱ्याला संशय आल्याने त्याने ही बाब तत्काळ रेल्वेच्या दक्षता विभागाकडे कळवली. त्यानंतर दक्षता पथकाने योजनाबद्ध पद्धतीने सापळा रचला. ठरलेल्या ठिकाणी आणि ठरलेल्या वेळी लाच स्वीकारताना हर्षिश कांबळे याला रंगेहाथ पकडण्यात आले. प्राथमिक चौकशीत तो रेल्वे विभागाशी कोणत्याही प्रकारे संबंधित नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

रेल्वे वर्तुळात खळबळ

सरकारी कामातील थकीत देयके मंजूर करून देण्याच्या नावाखाली लाच घेणाऱ्या या तोतया निरीक्षकाचा पर्दाफाश झाल्याने रेल्वे प्रशासनात आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा प्रकारे अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

पुढील कारवाई सुरू

या प्रकरणी संबंधित तोतया अधिकाऱ्याविरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असून, त्याने याआधीही अशाच प्रकारे इतर रेल्वे कर्मचाऱ्यांची फसवणूक केली आहे का, याचा तपास केला जात आहे. कल्याण रेल्वे स्थानक परिसरात भरदुपारी घडलेल्या या घटनेने एकच थरार निर्माण झाला होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Author

मुख्य संपादक - गोरख सोनवणे

9503585893

gorakhsonwane234@gmail.com

Sadesatranadi Road, Malwadi, Hadapsar, Pune 28

Google AdSense Icon Advertisement
Design by - Blogger Templates |