Maharashtra today news,,
Pune crime news:-मार्केटयार्ड पोलिसांच्या सतर्कतेमुळे गंभीर गुन्हा टळला दोन विधीसंघर्षीत बालकांकडून पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त
प्रतिनिधी अमोल धेंडे,,,
पुणे : मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैधरित्या पिस्तूल बाळगून गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडविण्याच्या तयारीत असलेल्या दोन विधीसंघर्षीत बालकांना मार्केटयार्ड पोलिसांनी ताब्यात घेऊन मोठा अनर्थ टाळला आहे. या कारवाईत एक देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
दि. १८/१२/२०२५ रोजी मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस हवालदार किरण जाधव (ब.नं. ७५५४) व पोलीस हवालदार कौस्तुभ जाधव (ब.नं. ६८५) यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, बुऱ्हाणी कॉलनी रोड, वसुंधरा बंगल्यासमोर सार्वजनिक रस्त्यावर दोन इसम अवैधरित्या पिस्तूल बाळगत असून त्यांच्याकडून गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता आहे.
ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा पाटील यांना कळविण्यात आली असता, त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अक्षयकुमार गडगडे यांच्यासह पोलीस पथकाने न्यु ईरा गार्डन परिसरात सापळा रचला. बातमीदाराने दिलेल्या माहितीप्रमाणे दोन विधीसंघर्षीत बालक त्या ठिकाणी येताच त्यांना ताब्यात घेण्यात आले.
पंचासमक्ष अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे मिळून आली. सदर विधीसंघर्षीत बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त मिलिंद मोहिते, सहा. पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत पोउपनि अक्षयकुमार गडगडे, पोहवा किरण जाधव, कौस्तुभ जाधव, राजेश थोरात, दत्तात्रय राऊत व पोअं आशिष यादव स
हभागी होते.
