Maharashtra today news
Pune accident News:-दौंड तालुक्यात अपघात : कार ओढ्यात कोसळून चालक गंभीर जखमी
दौंड तालुक्यातील चौफुला–केडगाव–शिरूर या मार्गावर आज झालेल्या अपघातात एक कार चालक गंभीर जखमी झाला आहे.
वाहन चालवत असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या ओढ्यात जाऊन कोसळली.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत जखमी चालकाला ओढ्यातून बाहेर काढले. त्यानंतर त्याला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
या अपघातामुळे काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. संबंधित घटनेची नोंद घेण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे.
