Maharashtra today news
Crime | Police Action | Pune | Election Security | Hadapsar | Law & Order निवडणूक काळात गावठी पिस्टलसह रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद
प्रतिनिधी अमोल धेंडे,,,,,
पुणे : आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे शहर पोलीस दलाकडून कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी नाकाबंदी, गुन्हेगार तपासणी व सातत्यपूर्ण गस्त सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई करत रेकॉर्डवरील एका आरोपीला गावठी पिस्टल व जिवंत काडतूसासह जेरबंद केले आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड तसेच पोलीस अंमलदारांच्या पथकाने केली. गोंधळेनगर परिसरात पेट्रोलिंग सुरू असताना पोलीस अंमलदार कुंडलीक केसकर व तुकाराम झुंजार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित इसमास ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव रोहन राजकुमार गायकवाड (वय २०), रा. गोंधळेनगर, हडपसर, पुणे असे असून तो पोलीस रेकॉर्डवरील आरोपी आहे. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस, असा सुमारे ५१ हजार २०० रुपये किमतीचा शस्त्रसाठा आढळून आला.
या प्रकरणी हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. १०९९/२०२५ अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) व मपोका कलम ३७ (१) (३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ ६ डॉ. सागर कवडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले व पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे यांच्या सूचनेनुसार तपास पथकाचे प्रभारी अधिकारी व खालील पोलीस अंमलदारांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली —
पोलीस उपनिरीक्षक :
हसन मुलाणी, सत्यवान गेंड
पोलीस अंमलदार :
दिपक कांबळे, भाऊसाहेब खटके, निलेश किरवे, बापु लोणकर, भगवान हंबर्डे, अजित मदने, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, महाविर लोंढे, आकाश धावडे व विजय कानेकर.
