Maharashtra today news
Crime, Law Enforcement, Local News, Electionsनिवडणूक पार्श्वभूमीवर मांजरी पोलिसांची अवैध धंद्यांविरोधात कारवाई १ किलो गांजासह आरोपी अटकेत
पुणे:आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडणे तसेच कोणत्याही अनुचित प्रकारांना आळा घालण्याच्या उद्देशाने पुणे शहर पोलीस दलाकडून कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यानुसार नाकाबंदी, गुन्हेगार तपासणी तसेच अवैध धंद्यांविरोधात सातत्याने कारवाई करण्यात येत आहे.
या अनुषंगाने मांजरी पोलीस स्टेशन हद्दीत नियमित गस्त व पेट्रोलिंग सुरू असताना, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे व त्यांच्या पथकाने पेट्रोलिंग दरम्यान संशयास्पद हालचाल करणारा सागर मल्हारी राखपसरे (वय ३४, रा. मांजरी, पुणे) यास ताब्यात घेतले.
पंचांच्या उपस्थितीत एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ५०(१) अंतर्गत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून झडती घेतली असता आरोपीकडून १ किलो ०५१ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या गांजाची अंदाजे किंमत रुपये ३३,९३० इतकी आहे. याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली असून त्यास मा. न्यायालयात हजर केले असता दिनांक २७/१२/२०२५ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक उमेश रोकडे करीत आहेत.
“निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अंमली पदार्थ व अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई सुरू असून अशीच कारवाई पुढेही सातत्याने सुरू राहील,” असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
ही कारवाई मा. श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त (पूर्व विभाग), मा. श्री. डॉ. सागर कवडे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ६ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. अनुराधा उदमले, सहाय्यक पोलीस आयुक्त, लोणी काळभोर विभाग यांच्या सूचनांनुसार पार पडली.
सदर कारवाईत पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे, अंमलदार प्रदीप सोनवणे, सचिन जाधव, निखील पवार, प्रशांत दुधाळ, अशोक अंधारे, चंद्रकांत रेजितवाड, रविकांत कचरे, ज्ञानेश्वर चोरमले व माधव हिरवे यांच्या पथकाने प्रशंसनीय कामगिरी बजावली.
Category: Crime, Law Enforcement, Local News, Elections
Tags: #PunePolice #NDPS #CannabisSeizure #ManjariPolice #ElectionSecurity #CrimeNews #PoliceAction #PuneMunicipalElections #IllegalDrugs
