लष्कर पोलीस स्टेशनकडील गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी जेरबंद
पुणे | लष्कर पोलीस
लष्कर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोल पंपाच्या ऑफिसमध्ये जबरदस्तीने प्रवेश करून फिर्यादी व इतरांना confin करून धमकावून जबरी चोरी करणाऱ्या गंभीर गुन्ह्याच्या पाहिजे आरोपीला गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने अटक करण्यात यश मिळवले आहे.
दि. २० नोव्हेंबर २०२५ रोजी लष्कर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. नं. १९५/२०२५ भा. दं. सं. कलम ३०९, १२७(२), ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट २ मार्फत सुरू होता.
दि. ०८ डिसेंबर २०२५ रोजी युनिट २ चे पोलीस अंमलदार आजीम शेख व सद्दाम तांबोळी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे लोहियानगर, गंजपेठ, पुणे येथे पाहिजे आरोपी दिसून येत असल्याची खात्री पटली. युनिट २ चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या आदेशानुसार पथकाने तत्काळ कारवाई केली.
त्या अनुषंगाने पथकाने संशयित इसम जाहिद कमरुदीन शेख (वय २० वर्षे, रा. लोहियानगर ५४ ए.पी., पुणे) यास ताब्यात घेऊन लष्कर पोलीस स्टेशनमध्ये हजर केले असून त्यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.
पथकातील अधिकारी व कर्मचारी :अमोल रसाळ (सहा. पोलीस निरीक्षक), संजय जाधव, विनोद चव्हाण, शंकर नेवसे, नागनाथ राख, संदीप शिर्के, विशाल दळवी, विजयकुमार पवार, संजय टकले, शंकर कुंभार, संजय आबनावे, गणेश थोरात, ओमकार कुंभार, योगेश मांढरे, सर्जेराव सरगर, सददाम तांबोळी, अजीम शेख.
