महाराष्ट्र टुडे न्यूज,,,
Maharashtra today news
Local News Pune Maharashtra
Social Work Accident Public Service Hadapsar Satav Wadi
Aadhar Foundation
Dhanraj GawaliAadhar Foundation Social Support Accident Victim
Hadapsar News
Satav Wadi Incident
Financial Assistance
Public Service
Pune Accident
Help for the Poor
हडपसर सातव वाडीत अपघातग्रस्त गरीब युवकाला आधार फाउंडेशनचा मदतीचा हात
हडपसर सातव वाडी येथे काही दिवसांपूर्वी एका गरीब युवकाचा दुर्दैवी अपघात झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र आर्थिक परिस्थिती अत्यंत हलकी असल्याने त्याच्या उपचारास अडथळे निर्माण झाले. डॉक्टरांनी तातडीने ऑपरेशन आवश्यक असल्याचे सांगितले.
या गंभीर परिस्थितीची माहिती मिळताच आधार फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय धनराज गवळी साहेब यांनी तत्परतेने पुढाकार घेत मदतीचा हात पुढे केला. त्यांनी ऑपरेशनसाठी ₹50,000/- इतकी रोख आर्थिक मदत तात्काळ उपलब्ध करून दिली. आर्थिक मदतीमुळे अपघातग्रस्ताला तत्काळ पुढील उपचारांसाठी हलविण्यात आले.
घटनेच्या वेळी पेशंटसोबत त्यांचे नातेवाईक तसेच पूनम सपकाळ, कांचन मालुसरे आणि इतर कुटुंबीय उपस्थित होते. सर्वांनी धनराज गवळी यांच्या या सामाजिक कार्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
जनतेसाठी नेहमी पुढाकार घेणारा, गोरगरिबांचा खरा ‘वाली’ म्हणून ओळख मिळवलेले धनराज गवळी साहेब यांनी पुन्हा एकदा मानवतेचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. 💐🙏

