ADVERTISEMENT
Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

Live TV

हडपसरमध्ये गुटखा विक्री करणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा दाखल ₹१.६२ लाखांचा मुद्देमाल जप्त — वानवडी पोलिसांची कारवाई

 


हडपसरमध्ये गुटखा विक्री करणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा दाखल₹१.६२ लाखांचा मुद्देमाल जप्त — वानवडी पोलिसांची कारवाई

हडपसर येथील रामटेकडी परिसरात प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या पती-पत्नीवर वानवडी पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी छाप्यात ₹१,६२,१८४/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

वानवडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक व पथक पेट्रोलिंगदरम्यान असताना त्यांना गोपनीय बातमी मिळाली की, रामनगर, छोटी मशिदीजवळील घरात गुलफाम अन्सारी आणि त्याची पत्नी नुरजहाँ अन्सारी हे विविध कंपनींचा पान मसाला, गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ शासनाच्या बंदी आदेशानंतरही विक्री करत आहेत.


पथकाने तात्काळ ठिकाणी छापा टाकला असता, दोघेही प्रतिबंधित पदार्थांची विक्री करत असल्याचे आढळले. घराची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थ आणि पान मसाला असा मुद्देमाल मिळून आला.

दोघांविरुद्ध वानवडी पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. ४९९/२०२५ नुसार

भा.दं.सं. कलम १२३, २२३, २७४, २७५,COTPA कायदा कलम ७(२), २०(२)अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 कलम २६(२)(i)(iv) व कलम ५९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (पूर्व) श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५ श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहायक पोलीस आयुक्त वानवडी विभाग श्रीमती नम्रता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजयकुमार डोके, सहा. पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख तसेच अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, आशिष कांबळे, अतुल गायकवाड, विष्णू सुतार, गोपाळ मदने, अभिजित चव्हाण, अमोल गायकवाड, अर्शद सय्यद, विठ्ठल चोरमले, बालाजी वाघमारे आणि महिला पोलिस कर्मचारी चैत्राली

 यादव यांनी सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Author

मुख्य संपादक - गोरख सोनवणे

9503585893

gorakhsonwane234@gmail.com

Sadesatranadi Road, Malwadi, Hadapsar, Pune 28

Google AdSense Icon Advertisement
Design by - Blogger Templates |