ADVERTISEMENT
Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

Live TV

गुंडाविरोधी पथकाची धडाकेबाज कामगिरी कोयत्याने हल्ला करून ₹3.80 लाख लुटणाऱ्या टोळीला अटक

 


Crime / Law & Order / Maharashtra / Pimpri-Chinchwad

Pimpri Chinchwad Police, Crime Branch, Gunda Virodhi Pathak, Knife Attack, Robbery Case, Ceramic Shop Robbery, CCTV Evidence, Accused Arrested, Maharashtra Police Action, Chinchwad Crime, 3.80 Lakh Loot, Ashish Buwa Case, Thergav Crime, PCMC Police, Criminal Investigation, Police Raid, Youth Accused Arrested

गुंडाविरोधी पथकाची धडाकेबाज कामगिरी कोयत्याने हल्ला करून ₹3.80 लाख लुटणाऱ्या टोळीला अटक

दिनांक 02/12/2025 रोजी रात्री 21.50 वाजता केशवनगर, चिंचवड येथील श्रीजी सिरॅमिक दुकानाजवळ फिर्यादी आशिष बुवा हे थांबलेले असताना चार अनोळखी इसमांनी हातातील धारदार हत्याराने वार करून त्यांना जखमी केले व फिर्यादीकडील एकूण ₹3,80,000/- रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घटनास्थळावर दहशत निर्माण करत पळून गेले.


सदर प्रकरणी चिंचवड पोलीस ठाणे गुन्हा क्र. 516/2025 भारतीय न्याय संहिता कलम 309(6), 311, 3(5), भारतीय शस्त्र अधिनियम कलम 4, 27, क्रिमिनल Amendment Act 3, 7 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(1)(3) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

घटनेची गंभीर दखल घेऊन मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे, सो., मा. सहपोलीस आयुक्त श्री. शशिकांत महावरकर, सो. यांनी गुन्हा त्वरीत उघडकीस आणण्याचे आदेश दिले.

मा. अपर पोलीस आयुक्त श्री. एस. डी. आवाड, सो. आणि मा. पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार, सहो. यांनी घटनास्थळी येऊन तपासासाठी स्वतंत्र पथके तयार करण्याच्या सूचना केल्या.

त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक एच. व्ही. माने, पोउनि समीर लोंढे व गुंडाविरोधी पथकातील अंमलदारांनी सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारांच्या मदतीने गुन्ह्यातील आरोपींचा माग काढला.

त्यानुसार आरोपी—

1. यश रमेश अंधारे (18 वर्षे, रा. थेरगाव गावठाण, मूळगाव – भोनजे, बार्शी, सोलापूर)

2. रितेश मुकेश चव्हाण (18 वर्षे, रा. जगताप नगर नं. 4 व 5, थेरगाव)

3. रुपेंद्र रुपबसंत बैद (19 वर्षे, रा. सुभाष नगर झोपडपट्टी, पिंपरी)

आणि एक विधी संघर्षित बालक यांना थेरगाव स्मशानभूमी जवळून ताब्यात घेण्यात आले असून चौकशीत त्यांनी गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिली आहे.

पुढील कार्यवाहीसाठी आरोपींना चिंचवड पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले.

ही कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे, सो., मा. सहपोलीस आयुक्त श्री. शशिकांत महावरकर, सो., मा. अपर पोलीस आयुक्त श्री. एस. डी. आवाड, सो., मा. पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार, सहो., मा. सहपोलीस आयुक्त (गुन्हे-1) डॉ. विशाल हिरे, सो. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत खालील अधिकारी व अंमलदारांचा सहभाग—

API एच. व्ही. माने, पोउनि समीर लोंढे, ग्रेड पोउनि प्रवीणकुमार तापकीर, स.पो.फौ. ठोकळ, स.पो.फौ. विक्रम जगदाळे, स.पो.फौ. अमित गायकवाड, पो.हवा गणेश मेदगे, गंगाराम चव्हाण, विजय गंभीरे, सुनील चौधरी, मयूर दळवी, विजय तेलेवार, शाम बाबा, नितीन गेंगजे, पो.शि रामदास मोहीते, विजय वेळापुरे, शुभम कदम, ज्ञानेश्वर गिरी व तौसिफ शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Author

मुख्य संपादक - गोरख सोनवणे

9503585893

gorakhsonwane234@gmail.com

Sadesatranadi Road, Malwadi, Hadapsar, Pune 28

Google AdSense Icon Advertisement
Design by - Blogger Templates |