३१ वर्षांपासून फरार घरफोडी प्रकरणातील आरोपी लातूर पोलिसांच्या विशेष पथकाच्या जाळ्यात
महाराष्ट्र टुडे न्यूज,
Maharashtra today news
लातूर : ३१ वर्षांपासून फरार असलेला घरफोडी प्रकरणातील आरोपी लातूर पोलीसांच्या विशेष पथकाच्या सापळ्यात
लातूर पोलीसांनी डारमंड फाईलमध्ये नोंद असलेल्या घरफोडीच्या गंभीर गुन्ह्यात तब्बल ३१ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस अटक करून मोठी कामगिरी बजावली आहे.
गांधी चौक पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. २०/१९९४ भादंवि कलम ४५७, ३८०, ३४ अंतर्गत दाखल असलेल्या घरफोडी प्रकरणात तसेच आरसीसी नं. ३९४/१९९४ व डी.एफ. नं. ५८/२०१४ या डारमंड फाईलतील गुन्ह्यांमध्येही आरोपीचा समावेश होता.
गुन्ह्याची माहिती :
१० ते ११ फेब्रुवारी १९९४ च्या दरम्यान फिर्यादी दत्तू बाबू नवघन यांच्या घरात तीन आरोपींनी कुलूप तोडून प्रवेश केला होता. घरातून ₹११,००० रोख, २४ साड्या आणि इतर साहित्य असा एकूण ₹१६,४२५ किंमतीचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी पळून जाऊन न्यायालय व पोलिसांना चकवून राहत होता.
गोपनीय माहितीवरून कारवाई:
विशेष पथकाला आरोपी दिपक निवृत्ती कांबळे (वय ५५, रा. विलासनगर) हा काही दिवसांपासून लातूरमध्ये वास्तव्य करत असल्याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून दिनांक १७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी आरोपीच्या घरावर धाड टाकण्यात आली. त्याला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.
अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि पथकाची कामगिरी :
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर) समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सपोनि मनाळे, पो.अ. दत्तात्रय शिंदे, वालचंद नागरगोजे, योगेश गायकवाड, श्रीकांत कुंभार यांनी सहभाग घेतला.
लातूर पोलिसांनी तब्बल तीन दशकांपासून फरार असलेल्या आरोपीस अटक करून डारमंड फाईलमधील प्रलंबित गुन्ह्याला पुन्हा प्रकाशात आणत प्रशंसनीय कामगिरी बजावली आहे. भविष्यातही अशाच फरार आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलि
सांनी दिला आहे.
