ADVERTISEMENT
Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

Live TV

Crime NewsYeolewadi Policeजुन्या वादाच्या वैमनस्यातून तरुणाचा खून येवलेवाडी पोलिसांकडून १२ तासांत तीन आरोपी जेरबंद

 


Maharashtra today news

प्रतिनिधी अमोल झेडे

Crime NewsYeolewadi Policeजुन्या वादाच्या वैमनस्यातून तरुणाचा खून येवलेवाडी पोलिसांकडून १२ तासांत तीन आरोपी जेरबंद

पुणे :येवलेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत येवलेवाडी कमानीपुढील मिनू मेहता सोसायटीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर जुन्या भांडणाच्या वैमनस्यातून एका तरुणाचा खून झाल्याची गंभीर घटना घडली होती. या प्रकरणातील तीन आरोपींना येवलेवाडी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत ताब्यात घेऊन उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

या घटनेत आकाश कृष्णा चाबुकस्वार (वय २१, रा. फुरसुंगी, पुणे) याचा रस्ता अडवून जुन्या वादाच्या कारणावरून वाद घालत सात जणांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीत त्याच्या डोक्यात दगड घालण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी येवलेवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ०२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), १८९ (२), १९०, १९१ (२) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) व १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेनंतर फरार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांच्या आदेशानुसार तात्काळ दोन तपास पथके तयार करण्यात आली. गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे तपास पथकाने आरोपी नामे

१) आदित्य सुभाष गायकवाड (वय १९, रा. गोकुळनगर, कोंढवा, पुणे),

२) गणेश किशोर मोरे (वय २०, रा. कात्रज–कोंढवा, पुणे),

३) कौशल्य उर्फ ऋषी जनार्धन मारे (वय १९, रा. तुळजाभवानी निवास, कोंढवा, पुणे)

यांना ताब्यात घेतले आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

ही कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०५ श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग श्रीमती नम्रता देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अमर काळंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

तपास पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश जाधव यांच्यासह पोलीस अंमलदार विशाल मेमाणे, निलेश देसाई, सुषमा हिंगमिरे, संदीप पवार, गणेश चिंचकर, अभिजीत जाधव, लक्ष्मण होळकर, सुजित मदन, विजय खेगरे, अनिल बनकर, मयूर मोरे, अमोल तावरे व अक्षय शेडगे यांनी सहभाग घेतला

Crime News

(Optional alternatives, if your paper/portal uses multiple categories)

Pune Crime

Law & Order

Police Action

Tags

Yeolewadi Police

Pune Crime News

Murder Case

Youth Murder

Old Rivalry

Police Action

Accused Arrested

Kondhwa Area

Wanowrie Division

Swift Police Action

Crime Investigation

Maharashtra Police

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Author

मुख्य संपादक - गोरख सोनवणे

9503585893

gorakhsonwane234@gmail.com

Sadesatranadi Road, Malwadi, Hadapsar, Pune 28

Google AdSense Icon Advertisement
Design by - Blogger Templates |