पुण्यातील नामांकित ज्वेलरी शॉप चालकांना बनावट दागिन्यांनी फसवणारा भामटा जेरबंद
Maharashtra today news,,
पुणे : शहरातील प्रसिद्ध ज्वेलरी शॉपमध्ये बनावट दागिन्यांच्या सहाय्याने फसवणूक करणाऱ्या भामट्याला विमानतळ पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे ७.३० वाजता पीएनजी ज्वेलर्स, विमाननगर शाखेत एका इसमाने बनावट अंगठी ट्रेमध्ये ठेवून हातचलाखीने १ लाख रुपयांची सोन्याची खरी अंगठी चोरून नेल्याची तक्रार दाखल झाली होती.
तक्रारीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांच्या आदेशानुसार तपास पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. तपासादरम्यान माहिती मिळाली की आरोपी पीएनजी ज्वेलर्स, औंध शाखेतही तत्सम चोरी करण्याच्या तयारीत आहे.
त्यानुसार ३० नोव्हेंबर २०२५ रोजी पोलीसांनी आरोपीला सापळा रचून ताब्यात घेतले. आरोपीचे नाव सैफ दिलीप बेळगावकर (वय 29) निवासी केदारेनगर, वानवडी, पुणे असे असून त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेली १,००,००० रुपये किंमतीची सोन्याची अंगठी हस्तगत करण्यात आली. प्राथमिक चौकशीत आरोपीने अशाच प्रकारे अनेक सराफ दुकानदारांना फसवल्याची माहिती समोर आली असून पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई अपर पोलीस आयुक्त (पूर्व विभाग) मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परि. ४ सोमय मुंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (येरवडा विभाग) प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद शेळके तसेच तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, मनोज बरुरे, पोलिस अंमलदार योगेश थोपटे, ज्ञानदेव आवारी, रुपेश पिसाळ, शैलेश नाईक, दादासाहेब बर्डे, हरीप्रसाद पुंडे, लालू कन्हे, राहुल जोशी, अंबादास चव्हाण, सागर कासार, पांडुरंग म्हस्के व शंकर वाघुले यांनी सहभाग घेतला.
