Maharashtra today news
गुन्हे वार्ता (Crime News)
Pune Crime, Fraud Case, PSI Pramod Chintamani, Bhosei Police Station, Investment Scam, Double Money Fraud
निलंबित पोउनि प्रमोद चिंतामणीसह तिघांवर ९३ लाखांची फसवणूक; भोसरी पोलीसांत गुन्हा दाखल**
भोसरी (पुणे) – निलंबित पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी यांनी गुंतवणूक दुप्पट करण्याचे आमिष दाखवून अनेक नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात अप.क्र. 687/2025 नुसार चिंतामणी आणि त्यांच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी संतोष तरटे (वय 43, रा. रहाटणी) यांनी तक्रार देत सांगितले की, आरोपी चिंतामणी यांनी “२० महिन्यांत पैसे दुप्पट” करून देण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या आमिषाला बळी पडून फिर्यादीने 18 लाख रुपये गुंतवले. मात्र आरोपीने केवळ 15.40 लाख रुपये परत केले आणि उर्वरित रक्कम न देता त्यांची फसवणूक केली.
चौकशीदरम्यान अनेक पीडितांचे जबाब नोंदवले गेले असून,आरोपींनी — गोरक्ष मेड (रिक्षा चालक) आणि संदीप अहिर (रिअल इस्टेट एजंट) — यांच्या मदतीने इतर नागरिकांकडूनही मोठ्या रकमा घेतल्याचे समोर आले. विविध नागरिकांकडून घेतलेल्या रकमेची एकूण फसवणूक 93 लाख रुपये इतकी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अजून काही लोकांची फसवणूक झाल्याची शक्यता असून फसवणुकीची रक्कम वाढू शकते. आरोपींकडून घेतलेल्या रकमांबद्दल अधिक तपास सुरू असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरी पोलीस हा गुन्हा
तपासत आहेत.
